मुंबई : आयपीएल 2021 : इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने आपल्या टी-20 कारकीर्दीतील पहिलं शतक ठोकलं आहे. आयपीएल 2021 मधील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या 28 व्या सामन्यात जोस बटलरने तुफानी शतकी खेळी करत त्याच्यावर टीका करणाऱ्या लोकांना उत्तर दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोस बटलरने सामन्याच्या सुरूवातीस सावध फलंदाजी केली आणि 39 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्यानंतर त्याने अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्यासाठी फक्त 17 बॉल घेतले. राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल 2021 मधीले हे दुसरे शतक आहे. पण जोस बटलरचे आयपीएलच नाही तर टी-20 क्रिकेटमधील देखील त्याचे पहिले शतक आहे. आतापर्यंत त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये म्हणजेच टी-20 लीगमध्ये शतक ठोकले नव्हते.


जोस बटलरने 56 बॉलमध्ये 10 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने पहिले शतक पूर्ण केले. यावेळी त्याचा स्ट्राईकरेट 178.57 होता. आयपीएल 2021 मोसमातील हे तिसरे शतक आहे. त्याच्या आधी त्याचा संघाचा कर्णधार संजू सॅमसनने शतक झळकावले होते, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर देवदत्त पडिकक्कलनेही या मोसमात शतक ठोकले आहे. अशाप्रकारे, राजस्थानसाठी या हंगामातील हे दुसरे शतक आहे.


बटलरने 64 बॉलमध्ये 11 फोर आणि 8 सिक्ससह 124 रन केले. आयपीएल 2021 हंगामातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याच्या आधी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने 119 धावा केल्या होत्या, तर देवदत्त पडिक्कलने 101 रन केले होते. फॅफ डुप्लेसिस 95 धावा केल्या होत्या. या आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 वेळा 90 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत पण त्या खेळाडूंना शतक पूर्ण करता आले नाही.