मुंबई: IPL स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.दोन दिवसांपूर्वी धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्सचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला होता. सरावादरम्यानही धोनीची परफेक्ट खेळी पाहून इतर संघांना घाम फुटायचा बाकी होता. आता IPLआधी केकेआर संघानंही असाच एक जबरदस्त व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPLआधी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीच्या जोरावर मैदानात तुफान आपलं आहे. दिनेशने सराव सामन्यात तुफानी फलंदाजी करून सर्वांना चकित केलं. 


गेल्या हंगामात दिनेश कार्तिकची कामगिरी विशेष चांगली नव्हती. 2020 मध्ये IPLमध्ये खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये त्याला केवळ 169 धावा करता आल्या. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी -20 करंडकात दिनेश 183 धावा केल्या. 



IPL2021च्या चौदाव्या हंगामात दिनेश कार्तिक पुन्हा एकदा फॉर्ममध्ये पाहायला मिळू शकतो. सरावा दरम्यान त्याने केलेल्या फलंदाजीमुळे आता संघाच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्याच्या तुफान फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


IPLच्या आधी दिनेश कार्तिकची कामगिरी तर जबरदस्त सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सराव सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकने 50 चेंडूमध्ये 90 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिकचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याची अशीच कामगिरी प्रत्यक्ष सामन्या दरम्यानही पाहायला मिळावी अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.