IPL 2021: विराट कोहलीच्या आयुष्यात अनुष्का इतकीच महत्त्वाची आहे `ही` गोष्ट
विराटच्या जन्मकुंडलीत अनुष्का तर क्रिकेट कुंडलीतील `ही` गोष्ट कधीच सोडली नाही.
मुंबई: विराट कोहलीच्या आयुष्यात अनुष्का शर्मा जेवढी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची गोष्ट क्रिकेट आणि त्याच्याशी निगडीत असलेली ही गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीने विराटला आणि विराटनं त्या गोष्टीला आपल्याशी घट्ट बांधून ठेवलं आहे. त्याच्या जन्मकुंडलीत अनुष्का तर क्रिकेटच्या कुंडलीमध्ये ही गोष्ट तो अजूनपर्यंत कधी सोडली नाही. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर आज ही कोणती महत्त्वाची गोष्ट खास आहे जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली ज्याला आपण किंग कोहली म्हणून ओळखतो तो 2008 म्हणजेच जेव्हापासून IPL सुरू झालं तेव्हापासून या संघाकडून खेळतो आहे. 14 वर्षात त्याने एकदाही आपली फ्रेंचायझी बदलेली नाही. सुरुवातीपासून तो RCB संघाकडून खेळत आहे. आतापर्यंत सर्व फलंदाजांमध्ये तो यशस्वी फलंदाज म्हणूनही ओळखला जातो.
विराट कोहलीच्या खांद्यावर RCB संघाच्या नेतृत्वाची धुरा 2013 पासून देण्यात आली. आतापर्यंत विराट कोहलीने कर्णधारपद उत्तम पद्धतीनं निभावलं. अर्थातच 2021च्या सुरुवातीच्या हंगामातसुद्धा कोहलीच्या संघाचा जलवा पाहायला मिळाला.
टीम इंडिया असो किंवा IPL कोहलीने आपलं नेतृत्व उत्तम पद्धतीनं केल्याचं दिसतं. मात्र एका गोष्टीची उणीव कायमच राहिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आतापर्यंत एकदाही IPLची ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही. पण विराट कोहलीच्या नेतृत्त्वामध्ये 2015, 2016 आणि 2020मध्ये प्ले ऑफ पर्यंत पोहोचण्यात यश मिळालं. 2021च्या IPLच्या चौदाव्या हंगामात कोहलीच्या संघाने जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिले दोन सामने जिंकले आहेत. यंदा IPLची ट्रॉफी जिंकण्यासाठी RCBने कंबर कल्याचं पाहायला मिळत आहे.
विराट कोहलीनं आतापर्यंत खेळलेल्या IPL सामन्यांवर आणि IPLमधील त्याच्या करियरमधील खास गोष्टी आज आपण जाणून घेऊया.
विराट कोहलीनं 2008 पासून 2021 या कालावधीमध्ये आतापर्यंत 195 सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये मिळून त्याने 4,560 बॉलमध्ये 6000हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं 2008 ते 2021 या IPLच्या काळात एकूण 5 शतक, 39 अर्धशतक, 512 चौकार आणि 201 षटकार ठोकले आहेत.
किंग कोहलीनं आपल्या या कारकीर्दीमध्ये एकदा ऑरेंज कॅपही मिळवली होती. 2016मध्ये त्याने एकूण 973 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 4 शतक तर 7 अर्धशतक देखील ठोकली होती. कोहलीसाठी 2016चा संपूर्ण IPL हंगाम त्याच्यासाठी सर्वात बेस्ट होता.
संपूर्ण IPL करियरमध्ये कोहलीनं केवळ 4 विकेट्स काढल्या आहेत. हे वाचून तसंही दोन मिनिटं थक्क व्हायला होईल पण त्याने काही वेळा बॉलिंग करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. 2008 ते 2016 दरम्यान केलेल्या गोलंदाजीत कोहलीला 4 विकेट्स काढण्यात यश मिळालं. विराट कोहलीनं 2008 ते 2012 आणि 2015, 2016 या IPLच्या हंगामामध्ये बॉलिंग केली होती.
किंग कोहलीनं 2008 आणि 2011 मध्ये चार विकेट्सही काढल्या आहेत. चौदाव्या हंगामात कर्णधार विराट कोहलीनं सुरुवात तर दमदार केली आहे. दोन सामने जिंकले आहेत. आता यावेळी कोहली आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत कसा घेऊन जातो हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.