मुंबई: वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स संघाने शेवटचा सामना जिंकला आहे. कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. ख्रिस मॉरिसनं 4 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. या सामन्या दरम्यान सकारियानं सर्वांची मन जिंकली आहे. त्याने पकडलेला कॅचचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता नाईट रायडर्सच्या (केकेआर) फलंदाजाच्या 18 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने ख्रिस मॉरिसने टाकलेल्या बॉलवर उंच मारून चौकार मारण्याचा प्रयत्नात असलेल्या दिनेशला चेतननं आऊट केलं. चेतन सकारियाने हवेत उडी मारत दिनेश कार्तिकने 
टोलवलेला बॉल कॅच घेतला. सुपरमॅन सारखं हवेत उडी मारून घेतलेला कॅच खूप चर्चेत आला आहे. सकारियाचं खूप कौतुकही केलं जात आहे.




सकारियाने घेतलेला कॅच पाहण्यासाठी इथे क्लिक करा


चेतनने कॅच घेतल्यानंतर दोन्ही हात पक्षाच्या पंखासारखे हवेत पसरले आणि आनंदाच्या उत्साहात धावू लागला. त्याचा हा अनोखा कॅच सर्वांनाच अवाक करणार होता. त्याचं सोशल मीडियावर आणि संघाकडूनही खूप कौतुक होत आहे. 


ख्रिस मॉरिसने 4 विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली आहे. कोलकात संघाला पराभूत केल्यानंतर राजस्थान संघाने यंदाचा हंगामात दुसरा विजय मिळवला आहे. संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलरने देखील उत्तम खेळी केली. राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, नितीश राणा यांच्या विकेट्स काढण्यात मॉरिसला यश मिळालं आणि त्यामुळे संघाचं मनोबल काहीसं खचलं. त्यामुळे 20 ओव्हरमध्ये केवळ 133 धावा करण्यात कोलकाताला यश आलं. मात्र राजस्थान संघाने 6 विकेट्सनं कोलकाता संघाचा पराभव केला आहे.