शारजाह : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) राजस्थान रॉयल्सवर (RR) 86 धावांनी  दणदणीत विजय मिळवला आहे. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी  172 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी राजस्थानला 85 धावांवर ऑलआऊट केलं. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शिवम दुबेने 18 रन्स केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. (IPL 2021 kolkata knight riders beat rajasthan royals by 86 runs at Sharjah Cricket Stadium) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताकडून शिवम मावीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. लॉकी फर्ग्यूसनने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शाकिब अल हसन आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनीही चांगली साथ दिली.


दरम्यान कोलकाताच्या या विजयामुळे  14 पॉइंट्स झाले आहेत. तसेच नेट रन रेट हा इतका झाला आहे. कोलकाताचा राजस्थान विरुद्धच्या या सामन्याआधी  +0.294 इतका नेट रनरेट होता. तो या विजयानंतर +0.59 इतका झाला आहे.


मुंबईचा मार्ग खडतर 


कोलकाताने राजस्थानवर विजय मिळवल्याने मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा या जवळपास धूसर झाल्या आहेत. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात कोलकाताचा पराभव व्हायला हवा होता. मात्र कोलकाताने विजय मिळवल्याने आता मुंबईचं आव्हान संपुष्टात आल्यात जमा आहे. 


प्लेऑफच्या चौथ्या जागेसाठीची लढाई ही पॉइंट्ससह नेट रनरेटवर आधारित आहे. हा सामना जिंकल्याने कोलकाताचे 14 सामन्यात 14 पॉइंट्स झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईनेही 13 सामन्यांपैकी 6 सामनेच जिंकले आहेत. 


मुंबईचा या मोसमातील साखळी फेरीतील अखेरचा सामना हा 8 ऑक्टोबरला हैदराबाद विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.