चेन्नई : मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्याच्या सीझनमधील इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे  इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करणारा हार्दिक अद्याप आयपीएलमध्ये गोलंदाजी का करू शकत नाही, असा प्रश्न क्रिकेट प्रेमींकडून सतत उपस्थित केला जात आहे. याचा खुलासा मुंबई इंडियन्सचे मुख्य कोच महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी केला आहे.


जयवर्धनेकडून खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्याला दुखापत झाली होती, त्यामुळे या सीझनमध्ये तो गोलंदाजी करू शकला नाही. असे जयवर्धने यांनी सोमवारी सांगितले. श्रीलंकेचा माजी फलंदाज आणि सध्याचे मुंबई इंडियन्सचे मुख्य कोच महेला जयवर्ध (Mahela Jayawardene) यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही या सीझनमध्ये हार्दिकच्या गोलंदाजी करण्याचीच वाट पाहत आहोत. पण इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे, आता तो या दुखापतीतून सावरु लागला आहे."


हार्दिक लवकरच गोलंदाजी करेल


हार्दिक पांड्या लवकरच गोलंदाजी करेल अशी अपेक्षा महेला जयवर्धन (Mahela Jayawardene) यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "आम्हाला सध्या हार्दिक (Hardik Pandya) संबंधीत कोणताही धोका घ्यायचा नाही. आम्ही प्रथम खात्री करुन घेऊ इच्छितो की, तो गोलंदाजी करण्यास पुर्णपणे फीट आहे. पुढील काही आठवड्यात तो गोलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. आम्ही मुद्दाम त्याला गोलंदाजी करायला देत नाही, असे काही नाही. दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्यावर तो गोलंदाजी करताना सगळ्यांना दिसेल.


हैदराबादविरूद्ध आश्चर्यकारक कामगिरी


डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समदला रन आऊट करुन संघाला 13 धावांनी विजय मिळविण्यात हार्दिकने (Hardik Pandya) महत्वाची भूमिका बजावली. महेला जयवर्धन (Mahela Jayawardene) म्हणाले की, "हार्दिकने बाऊन्ड्री लाईनवर फिल़्डींग करावी अशी आमची इच्छा आहे. कारण त्याचा थ्रो खूपच फास्ट आहे. तसेच तो चांगल्या प्रकारे कॅच पकडू शकतो, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे आम्ही त्याला 30 मीटरच्या घेऱ्यात फिल्डींगला ठेवतो."