यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 31 व्या सामन्यात (IPL 2021 31st Match) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 9 विकेट्सने धुव्वा उडवला. बंगळुरुने कोलकाताला विजयासाठी 93 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान कोलकाताने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. (ipl 2021 match 31 rcb captain virat kohli given batting tips to debutant Venkatesh Iyer after match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताच्या दोन्ही ओपनर्सने कोलकाताला सहज विजय मिळवून दिला. शुबमन गिलने 48 धावांची खेळी केली. तर पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरने 41 धावा चोपल्या. व्यंकटेशने कोलकाताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 


ज्याने बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेतला, त्याच व्यंकटेशला बंगळुरुचा  कर्णधार विराटने बॅटिंग टीप्स दिल्या. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विराट आणि व्यंक्टेशचा हा फोटो शेअर केला आहे. 'द ब्युटी ऑफ आयपीएल' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.


व्हीडिओमध्ये नेमकं काय? 


विराट आणि व्यंकटेश या दोघांचा 37 सेंकदांचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. विराट या व्हीडिओत व्यंकटेशला बॅटिंगचे धडे देताना दिसतोय. अंगावर येणारा चेंडूचा कसा झेलायचा, फटका कसा मारायचा याबाबत विराट व्यंकटेशला सांगताना दिसतोय.


याआधी आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही नवोदित खेळाडूंना कानमंत्र देताना दिसला होता.


पदार्पणात चमकला


व्यंकटेशचा बंगळुरुचा विरुद्धचा आयपीएलमधील पहिला सामना होता. पहिल्या सामन्यात प्रत्येक खेळाडूवर चांगली कामगिरी करण्याबाबतचं दडपण असतं. पहिलाच सामना, त्यात विजयी आव्हानाचा पाठलाग. कोलकाताला माफक आव्हान मिळालं होतं. मात्र व्यंकटेशवर ओपनर म्हणून संघाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी होती.


व्यंकटेशने ही जबाबदारी सार्थपणे पार पाडली. शुबमन गिलसह व्यंकटेशने 82 धावांची धमाकेदार भागीदारी केली. व्यंकटेशने एकूण 27 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 41 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याचं कौतुक केलं जातंय.