DC vs SRH Head to Head | दिल्ली विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, कोण ठरणार वरचढ?
दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyederabad) आमनेसामने असणार आहेत.
यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 33 वा सामना (Match 33 of IPL 2021) आज (22 सप्टेंबर) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyederabad) आमनेसामने असणार आहेत. हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा ही केन विलियमन्सकडे (Kane Williamson) असणार आहे. तर दिल्लीची जबाबदारी युवा रिषभ पंत (Rishbh Pant) सांभाळणार आहे. (ipl 2021 match 33 ipl today match 22 september 2021 dc vs srh head to head records)
हैदराबादची या 14 व्या मोसमातील स्थिती नाजूक आहे. हैदराबादने या पर्वात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत. यापैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली मजबूत स्थितीत आहे. दिल्लीने 8 पैकी 6 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला अस्मान दाखवलंय. तर 2 सामन्यात विजय मिळवण्यात अपयश आलंय.
दिल्ली 12 पॉइंट्ंससह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद 2 पॉइंट्ससह शेवटच्या अर्थात 8 व्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा हा सामना जिंकून प्लेऑफचा मार्ग आणखी सोप्पा करण्याचा मानस असेल. तर हैदराबादला पुनरागमन करण्यासाठी तसेच आव्हान कायम ठेवण्याची अखेरची संधी असेल.
हेड टु हेड रेकॉर्ड (DC vs SRH Head to Head)
आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ एकूण 19 वेळा आमनेसामने भिडले आहे. यामध्ये हैदराबाद वरचढ ठरली आहे. हैदराबादने या 19 पैकी 11 सामन्यांमध्ये दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीनेही हैदराबादला 8 मॅचेसमध्ये पराभूत केलंय. आकडे असे असले तरी दिल्लीची स्थिती ही आकड्यांपेक्षा आणखी मजबूत आहे.
त्यामुळे हैदराबादसमोर दिल्लीचं कडवं आव्हान असणार आहे. त्यामुळे दिल्ली आपली विजयी कामगिरी कायम ठेवते की हैदराबाद ब्रेक लावते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
कर्णधार बदलल्याने नशिब बदलणार?
हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिल्या टप्प्यात कर्णधारपदावरून हटवलं होतं. वॉर्नरला हटवल्यानंतर केन विलियमन्सनला ही जबाबदारी दिली होती. त्यामुळे कर्णधार बदलण्याचा निर्णय किती योग्य ठरतो, हे लवकरच सिद्ध होईल.