Ipl Mega Auction 2022 | आतापर्यंतचे महागडे खेळाडू, पाहा कोणाला किती रक्कम?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत.
बंगळुरु : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या मेगा ऑक्शनमध्ये (Ipl Mega Auction 2022) आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालमाल झालेत. या मेगा ऑक्शनमध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडू पैशांच्या बाबतीत चमकले आहेत. विशेष म्हणजे ज्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे, त्यांना फ्रँचायजीने मालामाल केलं आहे. त्यापैकी सर्वाधिक रक्कम मिळवलेल्या टॉप 10 खेळाडू कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (ipl 2021 mega auction day 1 top 10 expensive players shreyas iyer shardul thakur ishan kishan)
इशान किशन (Ishan Kishan)
विकेटकीपर बॅट्समन ईशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 15 कोटी 25 लाख रुपये मोजले आहे. ईशान किशन गेल्या काही काळापासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. तसेच ईशानने 13 व्या मोसमात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता.
दीपक चाहर (Deepak Chahar)
चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दीपक चाहरला 14 कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)
श्रेय्यस अय्यरलाही विक्रमी भाव मिळाला आहे. अय्यरला कोलकाताने (Kolkata) 12 कोटी 25 लाख रुपयांचा खजिना लुटवला आहे.
निकोलस पूरन (Nicholas Pooran)
विंडिजचा उपकर्णधार असलेल्या निकोलस पूरनला हैदराबादने 10 कोटी 75 लाख रुपये दिले आहेत.
शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)
आतापर्यंत चेन्नईकडून खेळणाऱ्या 'लॉर्ड' शार्दुल ठाकूरला 10 कोटी 75 लाख मिळाले आहेत. त्यामुळे धोनीच्या नेतृत्वात खेळणारा शार्दुल दिल्लीकडून खेळणार आहे.
वानिंदू हसारंगा
श्रीलंकन ऑलराउंडर वानिंदु हसारंगाला बंगळुरुने 10 कोटी 75 लाख मोजले आहेत.
हर्षल पटेल (Harshal Patel)
आयपीएलच्या 14 व्या मोसमात हॅट्रिक आणि सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज हर्षल पटेलवर पैशांचा पाऊस पडला आहे. आरसीबीने हर्षलला रिटेन केलं नाही. मात्र त्याला लिलावातून आपल्या ताफ्यात खेचून आणला. आरसीबीने हर्षलला 10 कोटी 75 लाख इतकी रक्कम मोजली आहे.
लॉकी फर्ग्यूसन
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला गुजरातने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. गुजरातने लॉकीसाठी 10 कोटी किंमत मोजली आहे.
प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)
टीम इंडियाचा नव्या दमाचा शिलेदार प्रसिध कृष्णाला राज्सस्थान रॉयल्सने 10 कोटी मोजून आपल्याकडे खेचलं आहे.
कगिसो रबाडा (Kagiso Rabada)
दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजाला पंजाबने 9 कोटी 25 मोजून आपल्या संघात घेतलं आहे.