मुंबई: मुंबई इंडियन्स संघाचा आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता दोन तोगड्या टीम एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. चैन्नई संघाने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर मुंबई संघाने 6 पैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये हा सामना होणार आहे. मुंबई संघाने राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केलं होतं. फलंदाजांमध्ये हव्या त्या आक्रमक पद्धतीने खेळताना दिसत नाहीत. त्यामुळे धोनीच्या टीमपुढे कसा टिकव लागतो पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राजस्थान विरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉक शानदार फॉर्ममध्ये दिसला. याशिवाय रोहित शर्माही फॉर्मात आहे. सूर्यकुमार यादवनेही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 




ईशान किशनला वगळल्यामुळे मुंबईला गोलंदाजीत आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. पण तो संघात पुनरागमन करेल की नाही ही बाब रोचक ठरणार आहे. कारण चेन्नईविरूद्ध त्यांची कामगिरी जास्त चांगली ठरली आहे. जयंत यादवच्या जागी ईशानचा संघात समावेश होऊ. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही बदल होण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. 


नाथन कूल्टर नाइलचा संघात समावेश केल्यानं गोलंदाजांची टीम मजबूत झाली आहे. तर तुफानी खेळीसाठी किरोन पोलार्ड आणि कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव यामुळे मधल्या फळीला मजबूती मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल.


चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि लुंगी नगिदी/ इमरान ताहीर


मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जयंत यादव, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट