मुंबई: पंजाब किंग्स विरुद्ध आज मुंबई इंडियन्स सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपली पत्नी संजना गणेशनच्या फोटोवर केलेल्या कमेंटमुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. आज होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमहार पुन्हा एकदा पंजाबच्या फलंदाजांना माघारी धाडण्यासाठी सज्ज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याआधी जसप्रीत बुमराहने पत्नी संजना गणेशनने इन्टावर शेअर केलेल्या फोटोवर रोमँटिक कमेंट दिली आहे. तिने चांगला प्रकाश शोधून चांगला फोटो काढा असं कॅप्शन देत आपल्या एक स्टायलिश लूक शेअर केला. त्यावर जसप्रीत बुमराहने हार्ट असलेले इमोजी पोस्ट केले आहेत.




या फोटोमध्ये संजनाने निळ्या रंगाचा टॉप परिधान केल्याचं दिसत आहे. तिचा हा स्टायलिश लूक चाहत्यांनाही आवडला. टीम इंडियाचा गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन 15 मार्च रोजी विवाहबंधनात अडकले होते. अगदी जवळच्या व्यक्तींसोबत खासगी स्वरुपात हा विवाहसोहळा पार पडला.


IPLमध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर आज दोन संघांमधील चुरस पाहायला मिळणार आहे. मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या तर आठव्या स्थानी पंजाब आहे. मुंबईनं 4 पैकी 2 लढती जिंकल्यात तर 2 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.