मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामाला काही तासांत सुरुवात होणार आहे. सर्वजण अक्षरश: तास मोजत आहे. 9 एप्रिल रोजी पहिलाच सामना रोहित शर्माची टीम म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लढणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत. कोहलीच्या संघातील सलामीवीर फलंदाज कोरोनाशी दोन हात करून संघात परतल्यानं थोडं टेन्शन कमी झालं आहे.


कधी होणार सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. 7 वाजता नाणेफेक होईल त्यानंतर सामना 30 मिनिटांनी सुरू होईल. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेवन


विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, एबी डिव्हिलियर्स, मोहम्मद अजहरुद्दीन (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिश्चियन, वाशिंगटन सुंदर, काइल जॅमीसन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल संघात असणार आहेत. फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल ओपनिंगला उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेवन टीम


ख्रिस लिन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह अशी टीम असणार आहे. रोहित शर्मासोबत ख्रिस लिन की ईशान किशन कोण ओपनिंगला उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याची माहिती मिळू शकली नाही.