मुंबई: काही दिवसांपूर्वी ऋषभ पंतने डोक्यावर पडणाऱ्या बाऊन्सरला हवेतच टोलवल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा असा प्रकार मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्या दरम्यान घडला आहे. राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान किरोन पोलार्ड क्रिझवर असताना हा प्रकार घडला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


राजस्थान रॉयल्स संघाकडून ख्रिस मॉरिस बॉलिंग करत होते. 18 व्या ओव्हर दरम्यान त्याने धोकादायक बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर इतका जबरदस्त होता की पोलार्डच्या हेल्मेटवर थेट बॉल आपटला आणि थेट चौकार गेला. 





मुंबई इंडियन्सचा फलंदाज पोलार्डने या बॉलला चौकार जावा यासाठी जे काही हावभाव केलेत ते आणखी मजेशीर आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


मुंबई इंडियन्सचा फलंदाज किरोन पोलार्डचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. बरेच लोक असे म्हणत आहेत की पोलार्डचा हात इतका मजबूत आहे की बॉलला बाउन्ड्री लाइनवर पोहोचवण्यासाठी मजबूत आहे.