मुंबई: चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू सामना रंगणार आहे. विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा टीम आज मैदानात भिडणार आहेत. या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघातील सुर्यकुमार यादवनं हिटमॅन रोहित शर्माचं टॉप सीक्रेट सर्वांसमोर उघड केलं आहे. या टॉप सीक्रेटची आता सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीमध्ये सूर्यकुमारने दिलेल्या माहितीनुसार हिटमॅन रोहित हा प्रत्यक्षात सामन्यादरम्यान किंवा मैदानात असतो त्यापेक्षा बाहेर खूप वेगळा असतो. त्याचं वागणं आणि तो ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी बघतो त्यामुळे त्याला हे एक दोनदा नाही तर 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं य़श मिळालं आहे. त्याला मजा-मस्ती करायलाही तेवढीच आवडते. त्याच्या या स्वभावामुळे तो प्रत्येक खेळाडूला उत्तम पद्धतीनं बांधून ठेवू शकतो. 


संघातील प्रत्येक खेळाडूसोबत त्याचं असलेलं नातं खूप वेगळं आहे. अगदी मैदानापासून ते मैदानाबाहेरही. त्याचं हे वेगळेपण हिटमॅन रोहित ते रोहित शर्मापर्यंत आहे. जे इतरांच्या तुलनेत त्यानं हे वेगळेपण जपलं आहे. रोहित शर्मा मैदानावर जे पाहतो त्यापेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे. प्रत्येकाने त्यांना मैदानात पाहिले आहे की ते परिस्थितीवर नियंत्रण कसे ठेवतो. मैदानाबाहेर तो आणखी परिपूर्ण आहे. 


5 वेळा विनर झालेल्या मुंबई इंडियन्स संघासमोर यावेळी देखील IPLची ट्रॉफी जिंकण्याचं तगड आव्हान असणार आहे. पहिलाच सामना चेन्नईमध्ये विराट कोहलीच्या संघासोबत असणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


मुंबई इंडियन्स स्वॉड


ख्रिस लिन, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, नाथन कूल्टर नाइल, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह अशी टीम असणार आहे. रोहित शर्मासोबत ख्रिस लिन की ईशान किशन कोण ओपनिंगला उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याची माहिती मिळू शकली नाही.