मुंबई : IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पाचवा सामना मुंबई इंडियन्सने गमावला आहे. सलग दोन पराभवामुळे रोहित शर्मा याचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे  आता मुंबईचे स्वप्न धोक्यात आले आहे. करो या मरो याप्रमाणे मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आता खेळावे लागणार आहे. (IPL 2021 :  Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, KKR Won by 7 Wickets) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) चांगला खेळ करत मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव (KKR beat MI) केला. कोलकाताच्या या विजयामुळे आयपीएल स्पर्धेचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे आता काही खरे नाही, असे दिसून येत आहे.


मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR)  यांच्यात चुरशीचा झाला. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने चांगली सुरुवात केली आणि रोहित शर्मासह क्विंटन डी कॉकने डावाची शानदार सुरुवात केली. सूर्यकुमार फार काही करू शकला नाही आणि धावा करून माघारी परतला. यानंतर इशान किशन आणि पोलार्ड देखील काही विशेष करू शकले नाहीत आणि स्वस्तात तेही माघारी परतले. मुंबईने 20 षटकांत 6 गडी गमावून 155 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाने 3 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.


कोलकाता नाईट रायडर्सने जबरदस्त खेळ करत मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव (KKR ) केला. कोलकाताने केवळ 15.1 षटकांत 156 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. कोलकाताच्या विजयात त्यांच्या तरुण खेळाडूंचे मोठे योगदान दिसून आले. राहुल त्रिपाठी याने 42 चेंडूमध्ये नाबाद 74 धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यरनं 30 चेंडूमध्ये 53 धावा केल्या.


दरम्यान, यापूर्वी चेन्नईने मुंबईचा पराभव केला होता. या दोन पराभवामुळे मुंबईची टीम टॉप चारमधून बाहेर पडली आहे. मुंबईने 2019 आणि 2020 या सलग दोन वर्षांमध्ये आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. यंदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणारी पहिली टीम होण्याची संधी मुंबईला आहे. पण या खराब कामगिरीमुळे त्यांचे हे स्वप्न धोक्यात आले आहे.


कोलकाताने (Kolkata Knight Riders) मुंबईवरील मोठ्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) चौथ्या क्रमांकावर धडक मारली आहे. तर मुंबईची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.