मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 14) 14 व्या सत्राच्या सुरवातीला आणखी काही दिवस बाकी आहेत. यंदाचा आयपीएल 2 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतात आयोजित करण्यात आला आहे. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे यूएईमध्ये आयपीएल खेळला गेला होता. आयपीएलच्या प्रत्येक सीझनपासून असे दिसून आले की, ऑरेंज कॅपबाबत बॅट्समॅनमध्ये चुरस सुरू असते. या सीझनमध्येही असेच काहीसे पाहिले जाऊ शकते. यावर्षी आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावे करु शकतील अशा सर्वोत्कृष्ट बॅट्समॅनवर नजर टाकूयात.


विराट कोहली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचा आणि आरसीबी कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कोहलीने आपल्या क्रिकेटच्या कारकीर्दीत बॅटिंगमध्ये अनेक रेकॉर्डसची नोंद केली आहे. एवढेच नव्हे तर 2016 मध्ये तो आयपीएलमधील ऑरेंज कॅप विजेताही आहे. त्यावेळी विराटने  एकूण चार शतके मारली होती.


ऋषभ पंत


यंदा श्रेयस अय्यरच्या जागी विकेटकीपर आणि बॅट्समॅन ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. पंत सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध पंतच्या बॅटने  भल्या भल्या बॅलर्सला निराश केले आहे. पहिल्या टेस्ट सीरीजमध्ये त्याने दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. त्यानंतर टी -20 आणि एकदिवसीय मालिकेतही तो हिट ठरला.


केएल राहुल


किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल गेल्यावर्षीचा ऑरेंज कॅप विजेता आहे. टी -20 क्रिकेटमध्ये राहुल हा भारताचा सर्वात विश्वासाचा आणि महत्वाचा बॅट्समॅन आहे. आयपीएल 2020 सारखेच या सीझनमध्येही राहुल ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात मोठा दावेदार आहे.


डेविड वार्नर


आयपीएलच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सर्वात जास्त ऑरेंज कॅप विजेता आहे. वॉर्नरने 2015, 2017 आणि 2019 च्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपसाठी स्वत:चे नाव नोंदवले. यावर्षी देखील वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्याच्या यादीत भागीदार आहे.


सूर्यकुमार यादव


मुंबई इंडियन्सचा मिडिल ऑर्डरमध्ये खेळणारा बॅट्समॅन सूर्यकुमार यादव हा खूप वेळा त्याच्या कारकिर्दीमुळे चर्चेत राहिला. सूर्याचा शेवटच्या आयपीएल सीझन मधील खेळ आश्चर्यकारक होता. यामुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. यावर्षी तो आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकू शकतो.