IPL 2021 PBKS vs DC: सामन्यापूर्वी पंजाब संघाला मोठा धक्का, के एल राहुल रुग्णालयात दाखल
के एल राहुल पोटाच्या दुखण्यामुळे IPLमधून बाहेर पडण्याची शक्यता, पंजाब संघाला मोठा धक्का
मुंबई: दिल्ली विरुद्ध पंजाब आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पंजाब संघाला मोठा धक्का बसला आहे. पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पंजाब किंग्सने ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे.
पंजाब किंग्सने दिलेल्या माहितीनुसार के एल राहुलच्या शनिवारी रात्री अचानक पोटात दुखू लागलं. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. के एल राहुलवर एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र ती आता होणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
के एल राहुल आजच्या सामन्यात दिसणार नाही असंच सध्या म्हणावं लागले. राहुल लवकर बरा व्हावा यासाठी चाहते आणि संघ, फ्रांचायझीकडून लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
के एल राहुलच्या पश्चात संघाचं नेतृत्व कोणाच्या खांद्यावर असेल याबाबद फ्रांचायझीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ख्रिस गेल किंवा मयंक अग्रवालच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा दिली जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र त्यावर अद्याप फ्रांचायझीकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही.