मुंबई: भारतीय लेग स्पिनर युजवेंद्र चहल  सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून IPLमध्ये खेळत आहे. यंदा BCCIच्या नव्यानं झालेल्या करारामध्ये युजवेंद्र अगदी शेवटी आहे. त्यावरून आता युजवेंद्रला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळणार की नाही यावरून चर्चांना उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्र चहलचा परफॉर्मन्स गेल्या काही दिवसांमध्ये चांगला राहिलेला नाही. गेल्या 7 IPLच्या सामन्यांमध्ये त्याने केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची एकूणच IPLमधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी देखील त्याच्यावर नाराज आहेत. 


पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना गमावल्यानंतर आरसीबीचे प्रशिक्षक सायमन कैटिच  म्हणाले की, "त्याचे स्थान सुरक्षित नाही असे आम्ही म्हणणार नाही." त्यांच्या स्पिनरने गोलंदाजी चांगली केली. युजवेंद्रनेही चांगल्याप्रकारे गोलंदाजी केली.


IPL 2021: चौथ्यांदा शून्यवर आऊट झाला पंजाबचा स्टार फलंदाज, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस


आमच्यासाठी हा दिवस जरी निराशाजनक असला तरी आम्ही पुन्हा नव्या जोमानं त्याच उत्साहाने पुन्हा येऊ असा विश्वास आरसीबीच्या कोचनं व्यक्त केला आहे. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात युजवेंद्रने 34 धावा दिल्या आणि केवळ 1 गडी बाद केला आहे.