IPL 2021: चौथ्यांदा शून्यवर आऊट झाला पंजाबचा स्टार फलंदाज, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

राजस्थान, चेन्नई, हैदराबाद आणि त्यानंतर बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सलग चौथ्या सामन्यात पूरन 0 वर आऊट झाला. 

Updated: May 1, 2021, 11:18 AM IST
IPL 2021: चौथ्यांदा शून्यवर आऊट झाला पंजाबचा स्टार फलंदाज, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस title=

मुंबई: बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाने 34 धावांनी विजय मिळवला. पंजाब संघाने 5 गडी गमावत 179 धावा केल्या. पंजाबचा स्टार फलंदाज नकोलस पुरन नेहमीप्रमाणे या सामन्यातही शून्यवर आऊट झाला. 

IPL 2021 चौदावा हंगामातील चार सामने निकोलससाठी अत्यंत वाईट ठरले. चार सामन्यांमध्ये तो डकआऊट म्हणजे शून्यवर आऊट झाल्यानंतर मात्र सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे. चार वेळा आतापर्यंत अशा पद्धतीनं आऊट झाल्यानं त्याच्यावर तुफान मीम्स होत आहेत. 

राजस्थान, चेन्नई, हैदराबाद आणि त्यानंतर बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सलग चौथ्या सामन्यात पूरन 0 वर आऊट झाला. सोशल मीडियावर त्याच्यावर खूप मीम्स व्हायरल होत आहेत.

एका युझरनं मीम शेअर केलं त्यात म्हटलं आहे निकोलस हा हंगाम संपल्यानंतर अडी विकायला बसणार आहे. तर दुसऱ्या मीममध्ये बदकांसोबत निकोलसचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पूरनवर भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. 

IPL 2021 RCB vs PBKS: विराट आणि मॅक्सवेलची विकेट काढताच बल्ले बल्ले!

बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 विकेट गमावून 179 धावा केल्या. पंजाबकडून केएल राहुलने नाबाद 91 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार लगावले. राहुलशिवाय ख्रिस गेलनेही 46 धावा केल्या. तर हरप्रीत बरारने नाबाद 25 धावांची खेळी केली.