Corona च्या शिरकावानंतर IPL 2021 स्थगित, कधी होणार उर्वरित 31 सामने?
खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने आयपीएल सामने स्थगित
IPL 2021 : आयपीएल स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे अखेर स्थगित झाली आहे. मंगळवारी बीसीसीआये याची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग खेळाडूंमध्ये वाढू लागल्याने बीसीसीआयने आपात्कालीन बैठकीत याबाबत निर्णय घेतला. बोया बबलमध्ये असताना देखील कोरोनाची लागण झाल्याने खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयने स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली.
कोरोनाचं संकट वाढत असताना आयपीएलच्या आयोजनावर आधीपासूनच टीका होत होती. अनेक खेळाडूंनी आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्ये माघार घेतली होती. तर कारी खेळाडूंनी टीका कही केली होती.
कधी होणार आयपीएलचे उर्वरित सामने?
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे BCCI ने 29 सामन्यानंतर आयपीएल स्थगित केलं. त्यामुळे स्पर्धेतील उर्वरित सामने हे टी-20 वर्ल्ड कपनंतर आयोजित केले जावू शकतात.
IPL लीग चेअरमन ब्रजेश पटेल यांनी म्हटलं की, 'टूर्नामेंट अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आम्ही पुढच्या उपलब्ध वेळेच याच्या आयोजनाबाबत विचार करु. पण या महिन्यात शक्यता कमीच आहे. सनराइजर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर अमित मिश्रा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं की, आम्ही या वर्षीच्या शेवटी आयोजन करण्याबाबत विचार करु शकतो. सप्टेंबर याचं आयोजन होऊ शकतं. पण आता याबाबत फक्त शक्यता वर्तवल्या जावू शकतात. सध्या तरी लगेचच टूर्नामेंटचं आयोजन नाही करणार आहोत.'
याआधी केकेआरचा संदीप वॉरियर्स आणि वरुण चक्रवर्ती यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.
ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंनी याआधी लीगमध्ये माघार घेतली होती. 2020 मध्ये आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. पण यंदा भारतात आयोजन करण्यात आलं होतं.