चेन्नई : आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे. चेन्नईच्या संघा बरोबर सध्या आणखी एका खेळाडूची चर्चा होत आहे, तो म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा. सध्या तो आपली जादू संघामध्ये दाखवत आहे. संघाचा सध्याचा कॅप्टन महेंन्द्र सिंग धोनी ने नुकतेच आपल्या संघासाठी 200 वी मॅच खेळली आहे. 39 वर्षाच्या धोनीने काही वर्षांपूर्वी इंटरनॅशनल क्रिकटमधून रीटायरमेंन्ट घेतली आहे. त्यानंतर तो फक्त आयपीलमध्येच खेळताना आपल्या चाहत्यांना दिसला आहे. परंतु धोनाने त्याची 200 वी मॅच खेळल्यानंतर आपल्या प्रवासा विषयी बोलताना आपण आता म्हातारे झालो आहे अशी भावना व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये धोनी आयपीलमधून सुद्धा रीटायरमेंन्ट घेऊ शकतो. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला लवकरच नवीन उत्तराधिकाऱी शोधण्याची गरज भासणार आहे. आशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने वक्तव्य केला की, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजामध्ये असे सर्व गुण आहेत ज्यामुळे आगामी काळात चेन्नई सुपर किंग्जची कॅप्टनशीप त्याला मिळू शकेल.


मायकेल वॉनच्या म्हणण्यानुसार, उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींगमध्ये उत्कृष्ट कामगिरा करणारा रवींद्र जडेजा सीएसकेमध्ये धोनीचा उत्तराधिकारी होण्यासाठी आघाडीवर आहेत.


वॉनने जडेजाला धोनीचा पर्याय सांगितला


मायकेल वॉनने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "धोनी आणखी 2 ते 3 वर्षे मॅच खेळू शकेल, तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा की, त्यानंतर तो चांगले खेळू शकेल का? आणि पहिल्यासारखा आपला खेळ दाखवू शकेल? त्यामुळे मला असे वाटते की, आता हे पाहावे लागणार आहे की, आपण कोणाच्या आजूबाजूला आपला संघ तयार करू शकतो. रवींद्र जडेजा असा क्रिकेटर आहे, ज्यांच्यासोबत मला एक संघ बनवायचा आहे. मला वाटते की, बॅालसोबत त्याचे मैदानावर चांगले जमते. तसेच बॅटींगसोबत त्याची चांगली मैत्री आहे.


चेन्नईचे पुनरागमन


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल 2021च्या साझनमध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव करुन या संघाला किती सामर्थ्य आहे ते दाखवून दिले. मायकेल वॉनच्या मते हा संघ दुसऱ्या आयपीएल संघांसाठी धोकाचा आहे.


पॉइंट टेबलवर चेन्नई दुसर्‍या क्रमांकावर


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ आता पॉइंट टेबलवर दुसर्‍या क्रमांकावर आला आहे आणि राजस्थान रॉयल्सविरूद्ध 45 धावांनी विजय मिळवल्याने त्यांची धावसंख्या सुधारली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांना चेन्नईने परतीचा इशारा दिला असल्याचे मायकेल वॉनचे मत आहे.


वॉनने सीएसकेचा अन्य संघांना धोका असल्याचे सांगितले


मायकेल वॉन म्हणाले की, यंदाच्या सीझनमधील चेन्नईची टीम वेगळी दिसत आहे. पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास पहिल्या चार संघांनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. जर मी अन्य संघात असतो तर मला वाटते की, ही धोक्याची घंटा आहे.