मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात टॅास दरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना पाहायला मिळाली. आयपीएलमध्ये प्रथमच कॅप्टन झालेला राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसनने टॅास उडवल्यानंतर लगेचच नाणे आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवले, त्यानंतर मॅच रेफरी आणि पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुल यांनाही धक्का बसला.


संजू सॅमसनने पॅंटच्या खिशात नाणे ठेवले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स मॅच झाली. त्यावेळेस कर्णधार संजू सॅमसनने टॅासच्या वेळी प्रथम टॅास फेकला आणि मग तो टॅास आपल्या खिशात ठेवला आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने गेला.


संजू सॅमसनचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. संजू सॅमसनने हे का केले?, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. या वेळेला मॅच रेफरी आणि टॅास करताना उपस्थित असलेला पंजाब किंग्जचा कॅप्टन केएल राहुल देखील आश्चर्यचकित झाला.



वानखेडे स्टेडियमवर सोमवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात पहिल्यांदाच कॅप्टनशाप करणाऱ्या  संजू सॅमसनला 63 चेंडूत 119 धावांची शानदार खेळी खेळली. तरी देखील राजस्थान रॉयल्सला 4 रनांनी हार स्वीकारावी लागली. हा सामना शेवटच्या बॉलवर निश्चित झाला. 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने 20 ओव्हरमध्ये सात विकेट्सवर 217 धावा केल्या. शेवटच्या बॉलवर सॅमसनला संघ जिंकण्यासाठी पाच धावांची गरज होती पण तो आउट झाला