मुंबई: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स वानखेडे स्टेडियमवर आज सामना रंगणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातून आज दोन महत्त्वाचे खेळाडू नसतील असं सांगितलं जात आहे. अक्षर पटेल आणि एर्निच नॉर्टिए कोरोनामुळे सध्या हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरणार नाही अशी चर्चा असतानाच राजस्थान रॉयल संघही आज एका स्टार खेळाडूला मिस करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्स संघातील स्टार खेळाडू बेन स्टोक्सच्या हाताला पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. हाताच्या बोटाला झालेली ही दुखापत जास्त गंभीर असल्यानं तो संपूर्ण IPLमधून बाहेर गेला आहे. तर आज त्याच्या हाताचा एक्स रे काढण्यात येणार आहे. 


राजस्थान संघातील बेन स्टोक्सच्या जागी आज संघात कोण खेळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. परदेशी खेळाडूचा विचार करायचा झाला तर डेव्हिड मिलरला प्लेइंग इलेवनमध्ये संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पहिल्या सामन्यात स्टोक्सने मनन वोहरासोबत ओपनिंग केली होती. दुखापतीमुळे स्टोक्स नसल्यानं आता सामन्याची सुरुवात जोस बटलर करणार आहे. संजू सॅमसनचा जलवा पुन्हा या सामन्यात पाहायला मिळेल अशी आशा चाहत्यांची आहे. 


स्टोक्सच्या जागी मिलरला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तो चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरेल अशी चर्चा आहे. तर राहुल तेवतिया आणि शिवम दुबे ऑलराऊंडर म्हणून खेळताना दिसणार आहेत. 


गोलंदाजीसाठी श्रेयस गोपाळ, स्पिनर सकारिया, रहमान, मॉरिस असणार आहेत. दिल्ली संघला कमी धावा देऊन त्यांना तंबुत पाठवण्यात आज या गोलंदाजांना यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.