दुबई : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघानं आयपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वातील 49 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद या संघाचा पराभव केला. ज्यामुळं प्लेऑफमध्ये संघाच्या आशा अद्यापही पल्लवित आहेत. 13 सामन्यांमध्ये केकेआरच्या संघानं 12 गुणांची कमाई केली असून संघ आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्याच हैदराबाद संघाच्या फलंदाजीच्या वेळी 19 व्या षटकात राशिद खाननं असं काही केलं की त्याची जोरदार खिल्ली उडवली गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादच्या खेळाडूंनी या सामन्यात कोलकात्याच्या खेळाडूंपुढे हात टेकले. 8 व्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या राशिद खान यालाही फार काही कमाल करता आली नाही. पण, त्याच्या फलंदाजीनं सर्वांना धोनी आठवला, हेसुद्धा तितकंच खरं. 


शिवम मावीनं 19 व्य़ा षटकात फेकलेल्या दुसऱ्याच चेंडूवर राशिदनं धोनीचा प्रसिद्ध असा हेलिकॉप्टर शॉट मारला. त्यानं फटका मारला खरा, पण यावेळी चेंडू सीमारेषेपलीकडे जाण्याऐवजी सीमारेषेपाशी असणाऱ्या खेळाडूच्या थेट हातात गेला आणि हा डाव कोलमडला. 




क्रीडारसिकांकडून खिल्ली 
सीमारेषेपाशी असणाऱ्या व्यंकटेश अय्यर यानं अगदी सहजपणे खानचा झेल टीपला. राशिद खान धोनीचा फॅन आहे. त्यानं शक्य त्या सर्व वेळी माहिचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे, तर त्यानं धोनीसारखाच हेलिकॉप्टर शॉटही मारला आहे. पण, यावेळी मात्र त्याला अपयशाचाच सामना करावा लागला. सोशल मीडियावर त्याची जोरदार खिल्ली उडवत, धोनीची नक्कल कोणालाच जमलेली नाही असे सल्ले त्याला क्रीडारसिकांनी दिले.