मुंबई: पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहे. के एल राहुल आणि ख्रिस गेलचं आव्हान मोडीत काढत पुन्हा एकदा विजय मिळवून बल्ले बल्ले करण्यासाठी विराटसेनेनं कंबर कसली आहे. तर दुसरीकडे पंजाब संघाने विराट कोहलीला पराभूत करण्यासाठी रणनिती ठरवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विरुद्ध 2 विकेट्स, हैदबाद विरुद्ध 6 धावा तर कोलकाता सोबत 38 धावांनी बंगळुरूला विजय मिळला. चेन्नई सुपरकिंग्स संघासमोर बंगळुरूला नमतं घ्यावं लागलं तो एक सामना वगळता 6 पैकी 5 सामन्यांमध्ये बंगळुरू संघाने विजय मिळवला आहे. बंगळुरूची ही विजयाची घोडदौड अशीच आज सुरू राहणार की के एल राहुल आणि गेल त्याला लगाम घालणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 




मागच्या सामन्यात गेल आणि के एल राहुल दोघंही फ्लॉप ठरले होते. कोलकाता विरुद्ध सामन्यात पंजाबला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. 6 पैकी केवळ 2 सामने जिंकण्यात पंजाब संघाला यश आलं आहे. त्यामुळे पंजाब आपल्या पराभवाची मरगळ झटकून पुन्हा विजय मिळवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ संभाव्य प्लेइंग इलेव्हन


विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ए बी डिव्हिलियर्स, ग्लॅन मॅक्सवेल, रजत पटीदार, वॉशिंग्टन सुंदर, हर्षल पटेल, डॅनियल सॅम्स, काइल जेमिनस, युजवेंद्र चहल


पंजाब किंग्स संघ संभाव्य प्लेइंग इलेव्हन


के एल राहुल (कर्णधार), ख्रिस गेलं, मयंक अग्रवाल, डेव्हिड मलान, शाहरूख खान, मोइसेस हेनरिक्स, दीपक हुड्डा, मोहम्मद शमी, ख्रिस जॉईन, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह