मुंबई: हैदराबाद विरुद्ध बंगळुरू चेपॉकवर झालेल्या सामन्यामध्ये हैदराबाद संघाला सामना गमवण्याची वेळ आली. एका ओव्हरमुळे विजय हातून निसटला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाने अवघ्या 6 धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

17व्या ओव्हरपर्यंत हैदराबाद संघाची सामन्यावर पकड अगदी मजबूत आहे असं वाटत असताना अचानक बाजी पलटली. हैदराबादचा पराभव झाल्यानंतर केवळ चाहतेच नाही तर स्टेडियममध्ये बसलेल्या अनेकांना अश्रू अनावर झाले. 


सनरायझर्स संघाची मालकीण आणि मिस्ट्री गर्ल काव्या मारन यावेळी खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. हैदराबाद संघानं सामना गमावल्यानंतर तिलाही रडू कोसळलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


Warner should open with Bairstow & also have to bring back Kane Williamson.




150 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनराइजर्स हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत फक्त 143 रनच करता आले. ऑरेंज आर्मीकडून डेविड वॉर्नरने सर्वाधिक 54 रन केले. तर मनीष पांडेने 38 धावांची खेळी केली. तरीही 6 धावांसाठी संघाच्या हातून सामना गेल्यानं मिस्ट्री गर्लला रडू कोसळलं.


गेल्या काही वर्षांपासून काव्या मारन IPLच्या लिलावापासून ते अगदी सामन्यापर्यंत SRHचा एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखली जाते. तिने चेन्नईमधून एमबीए पूर्ण केलं आहे. सध्या ती तिच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. IPL2021च्या लिलावादरम्यान देखील SRH संघासोबत ती दिसली होती.