मुंबई: IPL 2021च्या उर्वरित सामन्यांसंदर्भात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये उर्वरित 31 सामने कधी आणि कुठे घ्यायचे याबाबत चर्चा करण्यात आली. BCCIने घेतलेल्या बैठकीमध्ये आयपीएलचे स्थगित करण्यात आलेले 31 सामने भारताबाहेर घेणार असल्याचं निश्चित केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने हे UAEमध्ये घेण्याचं निश्चित झालं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. 




ipl 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंड बोर्ड भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये कोणताही बदल करणार नसल्याचं याआधीच इंग्लंड बोर्डनं स्पष्ट केलं होतं. तर टी 20 विश्वचषकचे ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान होणारे सामने देखील UAEमध्ये घेणार की भारतात घेणार यासंदर्भा अद्याप निर्णय घेणार आला नाही.


मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने भारतात टी 20 विश्वचषक स्पर्धा आयोजिक करण्यासाठी असणारे पर्याय आणि सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्यासाठी ICCकडे थोडा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आता IPL 2021चे सामने UAEमध्ये होणार हे निश्चित झालं असलं तरी त्याच्या तारखा मात्र अजून समोर आल्या नाहीत.


टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे. 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. 18-22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना होणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध हा सामना असेल. काही नागरिकांना हा सामना पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड सीरिज सुरू होणार आहे.