मुंबई: विकेटकिपिंग करत असताना ऋषभ पंतची किडेगिरी कायमच पाहायला मिळते. सामना मैदानात सुरू असो किंवा सराव असो पंत काही शांत रहात नाही. आपल्या स्लेजिंगनं तो भल्याभल्यांना गोंधळात टाकतो आणि दांड्या गुल करतो. तसाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला आहे. सरावा दरम्यान पुन्हा एकदा पंतची किडेगिरी पाहायला मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्स संघानं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ऋषभ पंत सराव करत आहे. या सरावा दरम्यान तो बॅटिंग करणाऱ्याला चिडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 



10 एप्रिलला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना होणार आहे. त्यासाठी पंत आणि त्याच्या संघाची कसून तयारी सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाल्यानं तो आय़पीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं नेतृत्व ऋषभ पंतच्या खांद्यावर आलं आहे. ऋषभच्या नेतृत्वामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ कशी कामगिरी करतो हे पाहाणं महत्त्वाचं आणि तितकीच औत्सुक्याचं ठरणार आहे.