मुंबई : राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू आणि फिरकी गोलंदाज रियान परागने आयपीएल 2021 च्या पंजाब किंग्जविरुद्धच्या चौथ्या सामन्यात फलंदाज ख्रिस गेलला बाद केल्यानंतर डान्स करत सेलिब्रेशन केलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंजाब किंग्जचा फलंदाज ख्रिस गेल शानदार शैलीत फलंदाजी करत होता. ख्रिस गेल राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता, त्यानंतर रियान परागने त्याची विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहाव्या षटकात राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटर रियान पराग गोलंदाजीसाठी आला आणि त्याने या षटकातील पाचव्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या हातून ख्रिस गेलला झेलबाद केले. युवा खेळाडू स्वत:ला सेलिब्रेशन करण्यापासून रोखू शकला नाही आणि वेगळ्या प्रकारे त्याने तो साजरा केला. आपल्या राज्यातील पारंपारिक नृत्य बिहूच्या स्टाईलमध्ये तो नाचला. हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्यात रियान परागने 1 ओव्हरमध्ये 7 रन देऊन गेलची विकेट घेतली.



संजू सॅमसनच्या कारकीर्दीतील तिसरे आयपीएल शतक झळकावूनही राजस्थान रॉयल्सला सोमवारी एका रोमांचकारी सामन्यात पंजाब किंग्सकडून चार धावांनी पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्जने सहा गडी राखून 221 धावा केल्या. त्याला उत्तर म्हणून राजस्थान रॉयल्स संघाने 217 धावा केल्या. संजू सॅमसनने शानदार शतक झळकावले.