मुंबई: IPLच्या चौदाव्या हंगामात कोरोनाचं संकट असलं तरी सर्व खेळाडू आपली काळजी घेऊन सामने खेळत आहेत. जसे खेळाडू मैदानात वेगवेगळ्या करामती गमती जमती करताना दिसतात तसेच मैदानाबाहेर देखील मजा मस्ती करताना दिसत आहेत. पांड्या बंधू असो किंवा पंत असो किंवा पराग असो. पराग तर आपल्या बिहू डान्सनं सर्वांची मनं जिंकून घेत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूनं चक्क जोस बटलरच्या बॅटिंगची अॅक्टिंग केली आहे. त्याची अॅक्टिंग पाहून सर्वांनाच हसू आवरेनासं झालं. राजस्थान रॉयल्स संघानं याचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर पोस्ट केल्यानंतर तो वेगानं व्हायरल झाला आहे. 





जोस बटलर याच्या मुलीचा दुसरा वाढदिवस सर्वांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी राजस्थान रॉयल्स संघातील डेव्हिड मिलर याने जोस बटलर मैदानात कसा खेळतो हे दाखवत त्याची नक्कल केली. हे पाहून सर्वांनाच हसू आवरेना झालं. त्याने केलेली नक्कल इतकी हुबेहुब आणि भारी होती की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 


पंजाब विरुद्ध पहिला सामना राजस्थान संघानं 4 धावांनी गमावला आहे. दुसरा सामना दिल्ली संघासोबत झाला होता. हा सामना 3 विकेट्सने राजस्थान संघ जिंकले होते. त्यानंतर CSKसोबत झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला होता. 


आता राजस्थान संघाचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स संघासोबत आहे. वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. किंग कोहलीच्या टीमवर राजस्थानला विजय मिळवता येतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.