मुंबई: मैदान असो किंवा बाहेर टीम इंडियाचे खेळाडू चाहत्यांना कधीच नाराज करत नाही. ते आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना किंवा त्यांना खास भेट देताना पाहायला मिळतात. हाच भावुक करणारा आनंदाचा क्षण पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यानंतर कोहलीचा फॅन असलेल्या राजस्थानच्या खेळाडूला कोहलीनं खास भेट दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्स संघातील ऑलराऊंडर खेळाडू रियान पराग आपल्या आसामी बिहू डान्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. फलंदाज आऊट होताच त्याने केलेल्या बिहू डान्सची सर्वत्र चर्चा होती. हा रियान किंग कोहलीचा जबरदस्त फॅन आहे. हे कोहलीला कळल्यानंतर त्याने खास रियानच्या बॅटवर आपली ऑटोग्राफ दिली आहे. 



रियानने आपली बॅट ऑटोग्राफसाठी पुढे करताच कोहलीने त्यावर ऑटोग्राफ दिली आणि याचा फोटो राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे. 


रियान परागसाठी हा सामना विशेष खास ठरला नाही. अपेक्षित यश आपल्या फलंदाजीमध्ये त्याला मिळू शकलं नाही. कोहलीची फलंदाजी पाहून रियान त्यातून काहीतरी पुढे आपल्या चुका सुधारेल आणि चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा संघासह चाहत्यांनाही आहे. 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राजस्थानवर 10 गडी राखून विजय मिळवला आहे. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहलीने तुफान फलंदाजी करत एकहाती विजय मिळवला. राजस्थान रॉयल्स संघाने चौथा विजय मिळवला असून पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान अढळपणे त्यांनी कायम राखलं आहे. 


The fanboy in Avesh Khan had to come out after the match #YehHaiNayiDilli #DCvMI #IPL2021 pic.twitter.com/Qfp32SwUS8



दुसरीकडे मुंबई विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स झालेल्या सामन्यात आवेश खानला मुंबईचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मानं खास गिफ्ट दिलं होतं. आवेशच्या जर्सीवर त्याने ऑटोग्राफ करून दिली होती. मुंबई विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात आवेश खाननं 2 विकेट्स घेतल्या होत्या.