मुंबई: देशभरात कोरोनाचं मोठं संकट आहेच त्यात IPLमध्येही कोरोना घुसला आहे. कोलकाताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला. हा सामना रिशेड्युल करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आज होणाऱ्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यावरही टांगती तलवार आहे. हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना स्थगित होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई सुपर किंग्जचे CEO काशी विश्वनाथन, गोलंदाजांचे प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस क्लिनर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिघांव्यतिरीक्त संघातील खेळाडूंचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. सोमवारी सकाळी 3 कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची पुन्हा चाचणी घेण्यात आली, परंतु निकालात कोणताही बदल झाला नाही. या संक्रमित सदस्यांना बायो बबलच्या बाहेर 10 दिवस वेगळे ठेवण्यात येणार आहे. 


या कारणमुळे MI vs SRH सामन्यावर टांगती तलवार
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार चेन्नई विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्या दरम्यान CSKचे बॉलिंग कोच मुंबई संघातील काही लोकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे नियमानुसार मुंबई संघातील खेळाडूंची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच सामना खेळवण्यात येणार आहे. या संदर्भात BCCI ने सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. 


या आधी कोलकाता संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. संदीप वॉरियर आणि वरूण चक्रवर्ती या दोघांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना स्थगित करण्यात आला होता.