IPL2021: मनीष पांडेच्या रिप्लेसमेन्टनं हैदराबादला आजतरी विजय मिळेल की पंजाब बाजी मारेल?
या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विजयाची आवश्यकता आहे. जर त्याला आणखी एक पराभव मिळाला तर स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्याचा मार्ग अधिक कठीण होऊ शकतो.
मुंबई: वानखेडे स्टेडियमवर आज दुपारी 3.30 वाजता सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब सामना होणार आहे. सलग तिसऱ्यांदा पराभूत झालेल्या हैदराबादला आजतरी पॉइंट टेबलवर विजयासाठी स्वत:चं खातं उघडता येणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनीष पांडे चेन्नई विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्यास अपयशी ठरल्यानं 20 वर्षीय प्रियम गर्ग त्याच्या जागी खेळण्याची शक्यता आहे. प्रियांकने गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण केले होतं. संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या मोसमात त्याने 14 सामने खेळले.
या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विजयाची आवश्यकता आहे. जर त्याला आणखी एक पराभव मिळाला तर स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा त्याचा मार्ग अधिक कठीण होऊ शकतो. या सामन्यात वॉर्नरने मनीष पांडेवर विश्वास राखला आहे की प्रियम गर्ग खेळत आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हैदराबाद टीम:
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), केन विलियमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अब्दुल समद, जेसन रॉय, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विराट सिंह, केदार जाधव, मुजीब उर रहमान आणि जे. सुचित.