मोठी बातमी! IPLच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे 2 खेळाडू जखमी
IPLनंतर टीम इंडियाचा 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंड दौरा आहे. श्रेयस अय्यर आणि उमेश यादव पाठोपाठ आणखी दोन खेळाडूंना दुखापत
मुंबई: IPL 2021 चौदाव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन खेळाडूंना दुखापत झाली आहे. याचा मोठा फटका टीम इंडियाला बसण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. आज IPLमधील तिसरा सामना चेपॉक स्टेडियमवर KKR विरुद्ध SRH होत आहे.
पहिल्या सामन्यात म्हणजेच मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू झालेल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झाली आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने गोलंदाजी केली नव्हती. बंगळुरू संघाकडून खेळत असलेल्या पांड्याच्या खांद्याला दुखापत झाल्यानं कर्णधार कोहलीची चिंता वाढली आहे. केवळ IPLसाठीच नाही तर टीम इंडियाच्या पुढच्य़ा दौऱ्यांसाठी पांड्याला फिट राहाणं गरजेचं असल्याची चर्चा आहे.
चेन्नई सुपार किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्या आधी इशांत शर्मा देखील जखमी असल्यानं तो संघात खेळू शकला नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने आवेश खानला संधी दिली. इशांत शर्मा अजून पूर्णपणे रिकव्हर झाला नाही अशी माहिती दिल्ली कॅपिटल्स संघाकडून मिळाली आहे.
8 एप्रिल रोजी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सर्जरी झाली आहे. त्यामुळे सध्या काही महिने तरी तो मैदानावर खेळेल की नाही याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे. उमेद यादवला देखील दुखापत झालेली अद्याप रिकव्हर झाली नाही. त्यामुळे उमेश यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा यांच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढू शकतं.
IPL संपल्यानंतर टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना 18 ते 22 जूनमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी हार्दिक पांड्या आणि इशांत शर्माला रिकव्हर होणं गरजेचं आहे.