दुबई : भारताच्या क्रिकेट टीममधील एक खेळाडू बऱ्याच काळापासून फ्लॉप चालत आहे, त्यामुळे खेळाडूची कारकीर्द वयाच्या 31 व्या वर्षी संपण्याच्या मार्गावर आहे. मनीष पांडे बऱ्याच काळापासून खराब फॉर्ममध्ये चालला आहे. अनेक वेळा त्याला संधी देण्यात आली आहे, पण तो प्रत्येक वेळी फ्लॉपच ठरला. मनीष पांडे बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळलेल्या आयपीएल सामन्यात 17 धावांवर बाद झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया टीममधून मनीष पांडेचे पान आधीच कापले गेले आहे आणि आता आयपीएलमधील या खेळाडूची कारकीर्दही संपण्याच्या मार्गावर आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर मनीषला मोठी संधी होती, पण पुन्हा एकदा तो अपयशी ठरला. मनीष पांडे आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघातील कमकुवत खेळाडू असल्याचे सिद्ध होत आहे.


मनीष पांडेच्या फ्लॉप फलंदाजीमुळे संपूर्ण मधली फळी उद्ध्वस्त होत आहे, ज्यामुळे संघाला मोठे नुकसान सहन करावे लागते आहे.


या खेळाडूला एकेकाळी टीम इंडियाचे भविष्य मानले जात होते, परंतु त्याची बॅट बहुतेक आता शांत झाली आहे. अशा परिस्थितीत त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळणे कठीण आहे. आता असे दिसते की, खराब कामगिरीनंतर सनरायझर्सचा संघ त्यांना जास्त संधी देणार नाही.


मनीष पांडे श्रीलंका दौऱ्यावर फ्लॉप ठरला


मनीष पांडेला श्रीलंकेविरुद्धच्या तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी देण्यात आली पण तो स्वत: ला सिद्ध करू शकला नाही. तो तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 26 धावा, दुसऱ्या वनडेमध्ये 37 धावा, तर तिसऱ्या वनडेमध्ये 19 चेंडूत 11 धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्याची कारकीर्द संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे.


मनीष पांडेने टीम इंडियासाठी शानदार पदार्पण केले होते. त्याने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 86 चेंडूत 71 धावा केल्या. यानंतर, त्याच्या पुढच्याच वर्षी, त्याने सिडनीमध्ये 81 चेंडूत 104 धावा केल्या आणि संघाचा विजय निश्चित केला.


 दुखापतीने त्याच्याकडून अनेक मोठ्या संधी हिरावून घेतल्या गेल्या. तो शानदार कारकिर्दीत चमकदार सुरुवात करू शकला नाही. अशा परिस्थितीत, असे वाटत होते की, IPLमध्येतरी कदाचित तो स्वतःला सिद्ध करत असेल, परंतु इथेही तो इथेही फ्लॉप ठरला.