दुबई : आयपीएलचा दुसरा टप्पा सुरु झाला असून कालच्या सामन्यात पंजाब किंग्सने केकेआरचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने शानदार अर्धशतक झळकावत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. पण या सामन्यात एक घटना देखील घडली ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या सामन्यानंतर, मैदानावरील अंपायरर्सवर सतत टीका केली जातेय. 


एका कॅचवरून झाला वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात पंजाबच्या फलंदाजीदरम्यान केएल राहुल शानदार फलंदाजी करत होता, तेव्हा केकेआरचा फिल्डर राहुल त्रिपाठीने शेवटच्या क्षणी एक शानदार कॅच घेतला. पण या झेलवर मोठा गोंधळ उडाला आहे. यावेळी शिवम मावी 19वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या एका चेंडूवर राहुलने हवेत एक शॉट खेळला, मात्र त्रिपाठीने बाऊंड्रीवरून धावताना त्याचा शानदार झेल घेतला. 


मैदानावरील अंपायर्सनी या कॅचचा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला. बराच वेळ या कॅचचे रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचाने चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचं ठरवलं आणि राहुलला नॉट आऊट दिलं.


लोकांनी दर्शवली नाराजी


पंचांच्या या निर्णयामुळे ट्विटरवर लोकं प्रचंड संतापले. तिसऱ्या अंपायरने हा चुकीचा निर्णय दिला आणि राहुल स्पष्टपणे आऊट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर अनेक लोक राहुलला नाबाद असल्याचंही म्हणतायत. यावर ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु असून काही ट्विटही प्रचंड व्हायरल होतायत.




अखेर पंजाबने मारली बाजी


टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 165 रन्स केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब टीमने राहुलच्या 55 चेंडूत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 67 धावांच्या खेळीच्या जोरावर 19.3 षटकांत 5 बाद 168 रन्स करून सामना जिंकला. केकेआरसाठी वरुण चक्रवर्तीने दोन तर शिवम मावी, सुनील नारायण आणि व्यंकटेश अय्यर यांना प्रत्येकी 1-1 विकेट काढली.