मुंबई: IPL 2021 चौदाव्या हंगामात आज सहावा सामना होणार आहे. बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना होणार आहे. यामध्ये विराट कोहलीला जिंकण्यात यश मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत 9 एप्रिलपासून 5 सामने झाले. या 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलनुसार कोणत्या स्थानवर आहे? ऑरेंज कॅप कुणाकडे आहे आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर आहे जाणून घेऊया.


पॉइंट टेबलनुसार कोण कितव्या स्थानावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता संघाने दोन सामने खेळले आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघ पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर आहे. दोन सामने खेळूनही मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या तर कोलकाता संघ साहव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा रनरेट खूप चांगल्या असल्यानं त्याने सध्यातरी पॉइंट टेबलमधील आपलं स्थान पहिलं अढळ ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. 


पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?


आतापर्यंत झालेल्या 5 सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स या प्रसिद्ध कृष्णा, सुंदर किंवा चाहरनं नाही आंद्रे रसेलनं घेतल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स संघातील आंद्रे रसेलकडे ही पर्पल कॅप आहे. 


त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स संघातील हर्षल पटेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स तर संपूर्ण सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. आज बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना होणार असून हर्षदला ही पर्पल कॅप मिळवण्याची संधी आहे. 


ऑरेंज कॅप कुणाऱ्या डोक्यावर?


कोलकाता संघानं जरी सामना गमावला असला तरी ऑरेंज कॅपमध्येही कोलकाता संघातील फलंदाज नितीश राणा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्समधील संजू सॅमसन तर तिसऱ्या स्थानावर के एल राहुल आहे.