मुंबई: IPL2021च्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू असा होणार आहे. यंदा CSKचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जर्सीची तुफान चर्चा झाली. इतकच नाही तर सरावा दरम्यान त्याच्या हेलिकॉप्टर शॉट्समुळे इतर संघांचं टेन्शन वाढलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या IPLच्या या रणधुमाळीत चर्चा सुरू आहे ती कॅप्टन कूलचं हे शेवटचं IPLअसणार का याची. याबाबत CSK संघाच्या सीईओ यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी याबाबत खुलासा जरी केला असला तरी कॅप्टन कूल पुढच्या वर्षीपासून IPL खेळणार की नाही याची चर्चा मात्र सगळीकडे रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 


मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन म्हणाले, 'मला वाटत नाही की हे महेंद्र सिंह धोनीचं IPL खेळण्याचं शेवटचे वर्ष आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि आम्ही इतर कोणत्याही खेळाडूबद्दल सध्या नियोजन करत नाही आहोत.''


'आयपीएल 2020मध्ये CSK संघाची कामगिरी फारच निराशाजनक होती. मागील हंगामात आमचे काही महत्त्वाचे खेळाडू संघाचा भाग नव्हते. 2 खेळाडूंना कोरोना झाला होता. यंदाच्या हंगामात संघाकडून चांगली कामगिरी होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वनाथन यांनी म्हटलं आहे.


महेंद्र सिंह धोनीने मात्र यंदा शेवटचं IPL खेळणार का याबाबत कोणताही खुलासा केला नाही. माही काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर फॅन्स माहीने एवढ्या लवकर IPL सोडू नये यासाठी प्रार्थना करत आहेत.