IPL 2022, PBKS VS RCB : पंजाबचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचं (Ipl 2022 Double Header) आयोजन आज करण्यात आलंय.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिल्या डबल हेडरचं (Ipl 2022 Double Header) आयोजन आज करण्यात आलंय. या डबल हेडरमधील दुसरा आणि हंगामातील तिसरा सामना हा पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. पंजाबने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये (D Y Stadium) करण्यात आलंय. (ipl 2022 1st double header match 3 pbks vs rcb punjab win the toss and elect to bowl first at d y patil stadium navi mumbai)
आकडेवारी कोणाच्या बाजूने?
पंजाब आणि बंगळुरु हे आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 28 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये पंजाब काहीशी वरचढ राहिली आहे. पंजाबने बंगळुरुला 15 वेळा पराभूत केलंय. तर बंगळुरुने पंजाबवर 13 वेळा विजय मिळवला आहे.
दोन्ही संघाचे नवे कर्णधार
पंजाब आणि बंगळुरु या दोन्ही टीमचे नवे कॅप्टन आहेत. पंजाबची कॅप्टन्सी ही मयंक अग्रवालकडे आहे. तर बंगळुरुची धुरा ही फॅफ डु प्लेसिस सांभाळणार आहे. केएल राहुल लखनऊकडे गेल्याने कर्णधारपदाची जबाबदारी ही त्याचा खास मित्र मयंकला मिळाली.
तर विराट कोहलीने आयपीएलच्या 14 व्या मोसमानंतरच कॅप्टन्सी सोडली. त्यामुळ बंगळुरुच्या नेतृत्वाची जबाबदारी ही फॅफ डु प्लेसिसकडे आहे. फॅफ गेल्या मोसमापर्यंत चेन्नईकडून खेळत होता. मात्र यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये बंगळुरुने त्याला आपल्याकडे घेतले.