मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022 Match 2) दुसरा सामना हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दिल्लीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला भाग पाडलं.  बॅटिंगला आलेल्या मुंबईची जोरात सुरुवात झाली. मुंबईच्या ईशान किशन आणि कॅप्टन रोहित शर्मा या जोडीने टीमला शानदार सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी सलामी अर्धशतकी भागीदारी केली. (ipl 2022 2nd match dc vs mi mumbai indian captain roit sharma and ishan kishan fifty opening partnership brabourne stadium at mumbai) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने शानदार फोर मारत अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. या अर्धशतकी भागीदारीत रोहितच्या 29 आणि इशानच्या 22 धावांचं योगदान होतं.  


रोहितला शार्दुलकडून 25 धावांवर जीवनदान 


रोहितला 25 धावांवर जीवनदान मिळालं. रोहितने 6 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर खलील अहमदच्या बॉलिंगवर स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. रोहितने मारलेला शॉट शार्दुल ठाकूरच्या दिशेने गेला. मात्र शार्दुलने कॅच सोडला. त्यामुळे रोहितला 25 धावांवर जीवनदान मिळालं. 


मुंबईची आणि कॅप्टनची सुरुवात चौकाराने


मुंबई आणि कॅप्टन रोहित शर्माच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सुरुवात ही चौकाराने झाली. रोहितने पहिल्याच ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर हा शानदार चौकार लगावला. तर रोहितने या पहिल्या ओव्हरचा शेवट हा सिक्स ठोकत केला. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 


दिल्ली प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, मंदीप सिंह, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि कमलेश नागरकोटी.