IPL 2022 | आयपीएलमुळे `सख्खे भाऊ पक्के वैरी`, कोण आहेत ते दोघे?
आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतेय. या 15 व्या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) सुरुवात 26 मार्चपासून होतेय. या 15 व्या मोसमात एकूण 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. या संघांमध्ये एकूण 70 साखळी सामने पार पडणार आहेत. या 15 व्या मोसमासाठी मेगा ऑक्शन पार पडलं. यामध्ये अनेक खेळाडूंची अदलाबदल झाली आहे. आयपीएलमध्ये या वेळेस 2 सख्खे भाऊ हे आता आमनेसामने खेळणार आहे. या दोन सख्ख्या भावांनी कधी काळी एकाच टीमला चॅम्पियन बनवलं होतं. (ipl 2022 brother hardik and krunal pandya will play 1st time against each other)
'सख्खे भाऊ पक्के वैरी'
आयपीएलच्या या 15 व्या मोसमात अनेक क्रिकेट चाहते हे त्यांच्या आवडत्या जोडीला मिस करणार आहेत. या वेळेस धोनी रैनाशिवाय खेळताना दिसेल. तर विराटला एबी डी विल्हीयर्सची उणीव भासेल.
मात्र अशीही एक भावांची जोडी आहे, जे या मोसमात आमनेसामने भिडणार आहेत. आपण बोलतोय ते हार्दिक आणि क्रृणाल पंड्या यांच्याबाबत.
या दोन्ही भावांची जोडी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहे. हे दोघे भाऊ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही एकत्र खेळतात. आयपीएलमध्ये या दोघांनी एकत्रच मुंबईसाठी पदार्पण केलं होतं. मात्र या 15 व्या मोसमात मुंबईने या दोघांना अनसोल्ड केलं. त्यामुळे ही भावांची जोडी फुटली.
हार्दिकच्या आयपीएल कारकिर्दीला 2015 मध्ये सुरुवात झाली होती. तेव्हापासून हार्दिक मुंबईकडूनच खेळायचा. मात्र तो यंदा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. गुजरातने हार्दिकला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर क्रुणाल लखनऊकडून खेळणार आहे.हे दोन्ही भाऊ सोमवारी 28 मार्चला होणाऱ्या सामन्यात आमनेसामने भिडणार आहेत.
टीम गुजरात टाइटंस
हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन, अभिनव सदरंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर साई किशोर, डोमिनिक ड्रेक, जयंत यादव, विजय शंकर, दर्शन नालकांडे, यश दयाल, अल्जारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेविड मिलर, रिद्धिमान साहा, मैथ्यू वेड, गुरकीरत सिंह, वरुण एरान आणि बी साई सुदर्शन.
टीम लखनऊ सुपरजायंट्स
केएल राहुल (कॅप्टन), मार्कस स्टोयनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, दीपक हुड्डा, मनीष पांडे, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, मार्क वुड, आवेश खान, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंथ चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसिन खान, आयुष बदोनी, करन शर्मा, ऐविन लुईस, मयंक यादव आणि काइल मेयर्स.