M S Dhoni | धोनीने भर रस्त्यामध्ये उभी केली बस, ट्रॉफीक पोलिसांसोबत हुज्जत
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस उरले आहेत. या बहुप्रतिक्षित 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघे काही दिवस उरले आहेत. या बहुप्रतिक्षित 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. या मोसमात 10 संघ ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. स्पर्धेत 2 नवे संघ जोडल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चेन्नईचा (Chennai Super Kings) 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आणखी उत्सुकता वाढवली आहे. (ipl 2022 chennai super kings captain mahendra singh dhoni bus driver role in officia promo)
धोनी नेहमीच आयपीएल सुरु होण्याआधी या मोठ्या स्पर्धेचं प्रमोशन करताना दिसतो. या वेळेसही धोनी आयपीएलंच प्रमोशन करताना हटके लूकमध्ये दिसला आहे. आयपीएल 2022 चे अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने प्रोमो रिलीज केला आहे.
प्रोमोमध्ये नक्की काय?
या प्रोमोत धोनी हटके लूकमध्ये दिसतोय. धोनी या प्रोमोत बस ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. धोनी या प्रोमोत साऊथच्या लूकमध्ये आहे.
आयपीएल 2022 च्या प्रोमोत धोनी बस चालवतो. धोनी अचानक भर रस्त्यामध्ये बस थांबवतो. ज्यामुळे एकच वाहतूक कोंडी होते. यानंतर धोनी बस भर रस्त्यामध्ये आणून बंद करतो आणि बसच्या पायऱ्यांवर बसतो.
धोनी हा सर्व प्रकार आयपीएल सुपरओव्हर पाहण्यासाठी करतो. जेव्हा वाहतूक पोलीस धोनीला याबद्दल जाब विचारतो, तेव्हा धोनीला त्याला म्हणतो की सुपरओव्हर सुरु आहे.
आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलेल्या या प्रोमोला अवघ्या काही तासांमध्ये 6 हजारपेक्षा अधिक यूझर्सनी लाईक केलं आहे.
15 व्या मोसमात एकूण 74 सामने
दरम्यान या 15 व्या हंगामात एकूण 74 सामने खेळवण्यात येणार आहेत. यापैकी 70 सामने हे साखळी फेरीतील असतील 4 सामने हे प्लेऑफचे असणार आहेत.
साखळी फेरीतील सामने महाराष्ट्रात
या साखळी फेरीतील 70 सामने हे महाराष्ट्रातील एकूण 4 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे आणि बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील आणि पु्ण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत.