मुंबई : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना संध्याकाळी 7.30 वाजता होत आहे. या सामन्यात दोन्ही नवखे कॅप्टन्स एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. श्रेयस अय्यर विरुद्ध जडेजा असा सामना असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता संघात व्यंकटेश अय्यरसोबत ओपनिंगला कोण उतरणार याची प्रतीक्षा होती. श्रेयस अय्यर कोणाला संधी देणार हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. कोलकाता संघाला ओपनिंगसाठी धडाकेबाज फलंदाज सापडला आहे. 


हा क्रिकेटपटू ओपनिंगला उतरण्याची शक्यता


गेल्या हंगामात कोलकाता संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला होता. यंदा या संघाला ट्रॉफीपर्यंत पोहोचायचं आहे. त्यासाठी पावरप्लेमध्ये सर्वात जास्त धावांच्या मदतीने हे शक्य होऊ शकतं. त्यामुळे ओपनिंगसाठी धडाकेबाज फलंदाज उतरवणं गरजेच आहे. श्रेयस अय्यर स्वत: तिसऱ्या स्थानावर उतरण्याच्या विचारात आहे. 


व्यंकटेश अय्यरसोबत अजिंक्य रहाणे ओपनिंग करण्याची शक्यता आहे. रहाणे खरंतर चांगला फलंदाज आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जरी त्याचा फॉर्म चांगला दिसत नसला तरी आता त्याला ही एक स्वत: ला पुन्हा सिद्ध करण्याची संधी आहे. व्यंकटेश अय्यर आणि रहाणेची जोडी चेन्नई विरुद्ध हिट ठरू शकते असा अंदाज आहे. 


अजिंक्य रहाणेने ओपनिंग फलंदाज म्हणून जबाबदारी पार पडली होती. त्याला 2011 मध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या संघात घेतलं होतं. त्यावेळी तो राहुल द्रविडसोबत ओपनिंगसाठी मैदानात उतरला होता. त्याने आरसीबीविरुद्ध शानदार शतक झळकावलं होतं.


पृथ्वी शॉसोबत दिल्लीसाठी ओपनिंग फलंदाज म्हणून कामगिरी केली आहे. त्याच्याकडे ओपनिंगसाठी अत्यावश्यक असणारा अनुभव आहे. जो कोलकाता संघाला फायद्याचा ठरेल. त्याने आयपीएलच्या 151 सामन्यांमध्ये 3941 धावा केल्या आहेत. 


श्रेयस अय्यर याआधी दिल्ली संघाचा कर्णधार होता. दुखापतीमुळे तो गेल्यावर्षी आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे दिल्लीचं कर्णधारपद रिषभ पंतकडे देण्यात आलं. श्रेयस अय्यरला दिल्ली संघाने रिटेन केलं नाही. श्रेयस अय्यरला कोलकाता संघाने आपल्या टीममध्ये घेतलं आणि कर्णधारपदाची जबाबदारी देखील त्याच्याकडे दिली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता तिसऱ्यांचा ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. 


चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन


डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगरगेकर आणि एडम मिल्ने.


कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारेन, वरुण चक्रवर्ती, टिम साउथी, उमेश यादव आणि शिवम मावी.