मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमापूर्वी (IPL 2022)  दिल्ली कॅपिट्ल्ससाठी (Delhi Capitals) गूड न्यूज आहे. दिल्लीच्या गोटात एका आक्रमक खेळाडूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे दिल्लीच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. या खेळाडूमध्ये सामना एकहाती पालटण्याची क्षमता आहे.  दिल्लीला केएसच्या रुपात पंतसारखा आक्रमक आणि धोनीसारखा फिनीशिंग टच देणारा खेळाडू भेटलाय. (ipl 2022 dc delhi capitals rishabh pant wicket keepar k s bharat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतच्या नेतृत्वात दिल्लीने 2021 मध्ये प्लेऑफपर्यंत मजल मारली होती. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली फ्रँचायजीने केएस भरतला आपल्यात घेतलं. दिल्लीने केएससाठी 2 कोटी मोजून आपल्याकडे घेतलं. केएस शानदार विकेटकीपिंग करतो. केएस कीपिंगसह बँटिंगही करतो.      


केएसचा 14 व्या हंगामात धमाका


केएसने 14 व्या मोसमात आरसीबीकडून खेळताना हंगामा केला होता. केएसने 14 व्या मोसमातील 8 सामन्यात 191 धावा केल्या. आरसीबीला प्लेऑफपर्यंत पोहचवण्यात केएसने निर्णायक भूमिका बजावली होती.


न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेटकीपर रिद्धीमान साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे केएसला संधी मिळाली. केएसने या सामन्यात स्टंपमागे न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.


स्टार फिनीशर


केएस फक्त बॅट्समन नाही, तर तो स्टार फिनीशर आहे. केएस आपल्या खेळीला फिनिशिंग टच देण्यात माहिर आहे. केएसने दिल्ली विरुद्ध 52 चेंडूत 3 चौकार आणि 4 खणखणीत सिक्ससह धमाकेदार 78 धावा केल्या होत्या. केएसने दिल्ली विरुद्धच्या या सामन्यातील 20 ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स ठोकत बंगळुरुला विजय मिळवून दिला होता.