मुंबई : आयपीएलच्या 15 मोसमातील (IPL 2022) डबल हेडरमधील पहिला आणि एकूण दुसरा सामना दिल्ली विरुद्ध मुंबई (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने मुंबईवर 4 विकेट्सने मात करत विजयी सुरुवात केली. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 178 धावांचं आव्हान दिल्लीने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ओपनर इशान किशनने 
(Ishan Kishan) आपला धमाका कायम ठेवत शानदार कामगिरी केली. (ipl 2022 dc vs mi mumbai indians ishan kishan scored 3 consecutive fifty)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशानने 34 बॉलमध्ये सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. इशानने फिफ्टी पूर्ण करण्यासाठी 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. इशानची दिल्ली विरुद्धची आणि एकूण सलग तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. यासह इशानने आयपीएलमधील 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केला.


ठरला तिसरा मुंबईकर


इशान मुंबईकडून सलग 3 अर्धशतक ठोकणारा तिसराच फलंदाज ठरला. इशानआधी मुंबईकडून असा कारनामा हा सचिन तेंडुलकर आणि क्विटंन डी कॉक यांनी केला आहे.


इशानची कामगिरी आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून आणखी बहरली आहे. इशानने 2020 पासून 5 अर्धशतकं लगावली आहेत. इशानने आयपीएल 2020 नंतर नाबाद 68*, 37, 25,  72* 50*, 84 आणि आता दिल्ली विरुद्ध 81 धावांची खेळी केली आहे. 


इशानने दिल्ली विरुद्ध एकूण 48 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. त्याने या खेळीमध्ये 11 चौकार आणि 2 सिक्स लगावले. इशानने केलेल्या या खेळीच्या जोरावरच मुंबईला 170 पेक्षा अधिक धावा करता आल्या.