मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसामातील (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात पराभवाने झाली. मुंबईला आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीकडून 4 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवापेक्षा मुंबईच्या पलटणसाठी टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईच्या घातक फलंदाजाला या सामन्यादरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे या खेळाडूवर रुग्णालयात जाण्याची वेळ आली. त्यामुळे मुंबईच्या पलटणमध्ये चिंतेच वातावरण आहे. (ipl 2022 dc vs mi mumbai indians opener batsman ishan kishan injured) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इशान किशनने दिल्ली विरुद्ध 48  बॉलमध्ये 81 धावांची खेळी केली. इशानला या खेळीदरम्यान दुखापत झाली. या दुखापतीमुळे इशानला टीम मॅनेजमेंटने स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात पाठवलं. या दुखापतीमुळे इशानला विकेटकीपिंगसाठी मैदानात येता आलं नाही.


इशानला शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर ही दुखापत झाली. शार्दुलने टाकलेला बॉल हा इशानच्या अंगठ्याला लागला. ज्यामुळे इशानला धावा घेणंही अवघड झालं.


दुखापतीनंतरही खेळत राहिला


इशानला दुखापत झाली. धावायलाही त्याला संघर्ष करावा लागत होता. मात्र इशानने मैदान सोडलं नाही. इशान अखेरपर्यंत खेळत राहिला आणि नॉट आऊट माघारी परतला.


इशानने 48 बॉलमध्ये तडाखेदार 81 धावांची खेळी केली. इशानने या खेळीत 11 चौकार आणि 2 खणखणीत सिक्स ठोकले. इशान हा या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू आहे. मुंबई फ्रँचायजीने इशानसाठी 15 कोटी 25 लाख रुपये मोजले.  


इशान किशनला झालेली दुखापत ही फार गंभीर नसावी, अशी प्रार्थना टीमकडून केली जात आहे. जर या दुखापतीमुळे इशानला स्पर्धेला मुकावं लागलं, तर हा मुंबईसाठी मोठा झटका असेल.