IPL 2022, GT vs DC | शुबमन गिलची वादळी खेळी, दिल्लीला विजयासाठी 172 धावांचे आव्हान
युवा बॅट्समन शुबमन गिलच्या (Shubaman Gill) वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे.
पुणे : युवा बॅट्समन शुबमन गिलच्या (Shubaman Gill) वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) दिल्ली कॅपिट्ल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. गुजरातकडून गिलने सर्वाधिक 84 धावांची खेळी केली. कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 31 धावांची खेळी केली. डेव्हिड मिलरने 20, राहुल तेवतियाने 14 आणि विजय शंकरने 13 धावांचं योगदान दिलं. (ipl 2022 gt vs dc gujrat titans set 172 run target for winning to delhi capitals at pune)
दिल्लीकडून मुस्तफिजूर रहमानने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. खलील अहमदने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कुलदीप यादवने 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी आणि वरुण एरॉन
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन : रिषभ पंत (विकेटकीपर-कॅप्टन), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, सरफराज खान, ललित यादव, रोवमॅन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.