IPL 2022 | गुजरातचा बंगळुरुवर 6 विकेट्सने शानदार विजय
गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (RCB) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने गुजरातला 171 धावांचं आव्हान दिलं होतं, गुजरातने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. राहुल तेवतिया (Rahul Tewatiya) आणि डेव्हिड मिलर या जोडीने गुजरातला मोसमातील आठवा विजय मिळवून दिला. (ipl 2022 gt vs rcb gujrat titans win by 6 wickets against royal challengers banglore rahul tewatiya shines)
गुजरातकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक नाबाद 43 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने नॉट आऊट 39 रन्स करत तेवतियाला चांगली साथ दिली. या व्यतिरिक्त शुबमन गिलने 31, ऋद्धीमान साहाने 29 आणि साई सुदर्शनने 20 रन्स जोडल्या. आरसीबीकडून शहबाज अहमद आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या विजयासह गुजरातचा या मोसमातील हा 8 वा विजय ठरला. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये 16 पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बंगळुरुने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 170 धावा केल्या.
आरसीबीकडून विराट कोहलीने 58 धावा केल्या. रजत पाटीदारने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने 33 रन्सचं योगदान दिलं.
गुजरातकडून प्रदीप सांगवानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, राशिद खान आणि लॉकी फर्ग्यूसन या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, राशिद खान, अल्जारी जोसफ, लॉकी फर्ग्यूसन, प्रदीप सांगवान आणि मोहम्मद शमी.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली, फाफ डुप्लेसी (कॅप्टन), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जॉश हेजलवुड.