पुन्हा कॅप्टन झाल्यावर धोनीचा विजयरथ सुरू...आता प्लेऑफही गाठणार
3 सामने जिंकूनही CSK प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? समजून घ्या गणित
मुंबई : आयपीएलचे सामने प्लेऑफच्या दिशेनं जात आहेत. आता सामने अटीतटीचे सुरू आहेत. प्लेऑफची रेस अधिक चुरशीची असणार आहे. यामध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे चेन्नई टीमने. प्लेऑफ मधून बाहेर होणारी टीम म्हणता म्हणता आता प्लेऑफला पोहोचण्याचं स्वप्न पाहात आहे.
चेन्नई टीमची कमान महेंद्रसिंह धोनीकडे आली. जडेजानं कर्णधारपद सोडून धोनीकडे देताच धोनीनं पहिला सामना जिंकवला आहे. त्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. धोनी पुन्हा टीमला प्लेऑफपर्यंत घेऊन जाईल अशी आशा आहे.
चेन्नई टीम तिसरा सामना जिंकून पॉईंट टेबलवर 9 व्या स्थानावर आहे. प्लेऑफपर्यंतची त्यांची वाटचाल खूप कठीण असेल पण अशक्य नाही. कारण धोनीच्या हाती कर्णधारपदाची कमान आहे. धोनीला यशस्वी कॅप्टन म्हटलं जातं. त्याचा अनुभव आणि फिल्डिंग या दोन्ही गोष्टीतून तो शेवटच्या क्षणी सामना पलटवतो.
चेन्नईने जर उरलेले पाचही सामने जिंकले तर 16 गुण मिळवून प्लेऑफमध्ये चेन्नई पोहोचू शकते. पुढचा एकही सामना जर चेन्नई टीम पराभूत झाली तर प्लेऑफच्या आशा मावळल्या. मात्र पाचही सामने एकामागे एक जिंकले तर प्लेऑफचं तिकीट नक्की आहे.
दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेट रनरेटची काळजीही घ्यावी लागणार आहे. कोलकाता, पंजाब टीम स्पर्धेत आहेत. त्यामुळे नेट रनरेट सांभाळणं चेन्नईसाठी महत्त्वाचं असेल. धोनी कर्णधारपदावर आल्याने पुन्हा चाहते आणि टीममधील खेळाडूंना जोश आला आहे.
चेन्नईनं हैदराबाद विरुद्ध अत्यंत चांगली कामगिरी केली. सतत फ्लॉप शो करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने 99 धावा केल्या. त्याचं थोडक्यासाठी आयपीएलमधील शतक हुकलं. डेवोन कॉन्वेने 85 धावा केल्या आहेत.