मुंबई : आयपीएलच्या 15 वा मोसम (IPL 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या 15 व्या मोसमात 2 संघ जोडले जाणार आहेत. त्यामुळे यावेळेस आणखी रंगत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान या 15 व्या हंगामाच्या आयोजनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या मोसमाचं आयोजन दक्षिण आफ्रिकेत (South Africa) होण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त दिलं आहे. (ipl 2022 ipl 15 season likely be moved  to south africa due to corona pandemic)
 
भारतातील कोरोनाची तिसरी लाट एप्रिल 2022 पर्यंत नियंत्रणात न आल्यास, श्रीलंकेचा आयोजनासाठी पर्याय म्हणून विचार केला जाईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या (IPL 2021 ) दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं होतं. बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही खेळाडू पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने यूएईत खेळवण्यात आले होते.  


यूएईत आयोजन का नाही? 


"आम्ही दरवेळेस यूएईवर विसंबून राहू शकत नाही. यासाठी आम्ही दुसरा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वेळेचं अतरही खेळाडूंसाठी पूरक आहे", असं बीसीसीआयचे अधिकारी इंडियन एक्सप्रेससोबत बोलले.


आफ्रिकेत दुसऱ्यांदा आयोजन?  


आयपीएल स्पर्धेत 15 व्या मोसमापासून 2  संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण संघांची संख्या 10 झाली आहे. यामुळे अर्थातच सामन्यांची संख्याही वाढणार आहे. यामुळे या वेळेस 15 व्या हंगामाचा कालावधी वाढणार आहे.


या लोकप्रिय क्रिकेट लीगमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद  हे  2 नवे संघ असणार आहेत. जर आयपीएल आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर ही आफ्रिकेचत आयोजनाची दुसरी वेळ ठरेल. याआधी 2009 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुकांमुळे स्पर्धेचं आयोजन आफ्रिकेत करण्यात आलं होतं.  


आफ्रिकेला पहिली पसंती का? 


बीसीसीआयने आयपीएलसाठी दक्षिण आफ्रिकेला प्रथम प्राधान्य देण्यामागे मठं कारण आहे. टीम इंडिया सध्या आफ्रिका दौऱ्यावर आहे. या ठिकामी टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) खेळाडूंची हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टीम इंडिया बायो-बबलमध्ये  (Bio Bubble) नाहीत. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएल 2022 बाबतच्या आयोजनाबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.